शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (08:10 IST)

दळवींच्या कारची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल

crime
मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक (दि.२९) करण्यात आली होती. त्यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू विक्रोळी पोलीस करत आहेत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दत्ता दळवी यांना (दि.२९) रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर भांडुपमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
 
आज (दि.३०) अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू विक्रोळी पोलीस करत आहेत.