1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (20:28 IST)

भाजपने सनी देओलचा बंगला वाचवला पण नितीन देसाईंना मदत केली नाही : संजय राऊत

sanjay raut
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली. भाजपने आपला खासदार सनी देओलचा बंगला लिलावात निघताना तातडीने हस्तक्षेप करून त्याचा बंगला वाचवला पण त्यांनी नितिन देसाई अडचणीत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
 
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “सनी देओलवर बँकेचे सुमारे 60 कोटी रुपये कर्ज होते. त्यामुळेच बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव जाहीर केला. मात्र 24 तासांत दिल्लीतील नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर बँकेकडून हा निर्णय बदलण्यात येऊन लिलाव रद्द करण्यात आला. भाजपने आपला खासदार आणि त्यांचा बंगला वाचवला,” असा आऱोपही त्यांनी केला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “ नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या करण्यापुर्वी दोन दिवस आधी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती आणि कर्जाची रक्कम परत करण्यासाठी मुदत वाढवून स्टुडिओ वाचवण्याची विनंती केली होती, परंतु कोणीही त्यांना मदत केली नाही. दिल्लीहून परतल्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केली.” असा दावाही त्यांनी केला.

Edited By - Ratnadeep Ranshoor