मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (08:29 IST)

वसई रोड: पतीने पत्नीला रेल्वेखाली ढकलले

indian railway
Husband pushed wife under train in vasai : माणसाच्या क्रूरतेचे उदाहरण वसईतील एका घटनेने समोर आले आहे. वसईरोड रेल्वे स्थानकात पतीने पत्नीला रेल्वे खाली ढकलून ठार मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन लहान चिमुकल्यांसह गाढ झोपेत असलेल्या पत्नीला जाग करून तिला भरधाव एक्स्प्रेसच्या खाली ढकलून दिले.हा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी वसईरोड रेल्वे स्थानकात घडला आहे. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर आरोपी पती दोन्ही मुलांसह पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
 
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वस‌ई रोड रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर झोपले होते. ते कुठून आले होते व कुठे जाणार होते याची अद्याप माहिती नाही. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीला त्याने उठवले आणि अवध एक्स्प्रेस च्या समोर तिला ट्रॅकवर ढकलून दिले. त्यानंतर आरोपी पती आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन तिथून पळून गेला. वसई लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.