Ulhasnagar: उल्हासनगर में 80 फूट उंचावर बांधलेली दहीहंडी मद्यपीने फोडली
दहीहंडी सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली गेली.उल्हास नगर मध्ये कॅम्प क्रमांक पाच परिसरातील नेताजी चौकात जय भवानी मित्र मंडळाने दही हंडी आयोजित केली होती. ही दही हंडी फोडणाऱ्या 55 हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते. सर्व गोविंदा पथकांचे दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न करून झाले होते. शेवटचे दोन गोविंदा पथक शिल्लक होते. कार्यक्रम जल्लोषात सुरु असताना एक माथेफिरू मद्यपी 80 फूट उंच बांधलेल्या दहिहंडीवर दही हंडी च्या बाजूला असलेली दोरीला लटकून दहीहंडीच्या मध्यावर आला आणि त्याने चक्क आपल्या डोक्याने दहीहंडी फोडली.हा सर्व प्रकार पाहून उपस्थितांनी कल्लोळ केला. या प्रकारात सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असून एवढ्या उंचीवर या माथेफिरू मद्यपीला लटकलेलं पाहून तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी माथेफिरु मद्यपीला ताब्यात घेतले.