शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (11:18 IST)

Thane :दहीहंडी उत्सवात नाचताना गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू

death
यंदा तब्बल 2 वर्षानंतर दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला गेला. कोरोनाच्या संकटानंतर यंदाच्यावर्षी कोरोना निर्बंध मुक्त सण साजरे गेले जात आहे. दहीहंडी चा सण देखील जल्लोषात साजरा करण्यात आला या सणासाठी गोविंदांमध्ये उत्साह जोरात असतो. ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात येते या साठी गोविंदा पथके उत्साहात भाग घेतात. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. पण ठाण्यात या उत्साहात विरझन लागले आहेत. ठाण्यात वर्तकनगर दही हंडी उत्सवासाठी मुंबईतील लालबागचे गोविंदा पथक आले होते. या उत्सवात नाचताना एका गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. राजेंद्र आंबेकर(49) असे या गोविंदाचे नाव आहे. 

ठाण्यातील वर्तकनगर मध्ये दहीहंडी फोडण्यासाठी लालबागमधील साईसदन गोविंदापथकातील राजेंद्र आंबेकर हे नाचताना अचानक खाली पडले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्यावर उपचारसुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.