1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (14:21 IST)

कोरोनाकाळात मुंबईत पाणी - पाणी, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

very heavy
मुंबईकरांनो अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. सकाळपासून मुंबई शहरास उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने बुधवार आणि गुरुवारी मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा याआधीच व्यक्त केला होता. त्यानुसार सकाळपासूनच मुंबईला जोरदार पावसाने झोडपू काढले आहे. अंधेरी सब वे येथे पावसाचे पाणी भरले आहे. परिणामी, वाहतुकीसह पादार्‍यांसाठी दोन्ही बाजूने सब वे बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी याठिकाणी महापालिका कर्मचार्‍यांसह पोलिस तैनात करण्यात आले आहेत.