शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2020 (11:39 IST)

वांद्रे गर्दी प्रकरण: विनय दुबे नेमके कोण?

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनावर परराज्यातील मजुरांना दिशाभूल करत एकत्र करून गर्दी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी विनय दुबेंवर आरोप आहे की त्यांनी मुंबईच्या कुर्लामध्ये 18 एप्रिल रोजी प्रवाशी मजुरांकडून देशव्यापी विरोध-प्रदर्शन करण्याची धमकी दिली. पोलिसांप्रमाणे आरोपी विनय दुबे 'चलो घर की ओर' मोहीम चालवत होते. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली होती. सोबतच आपली एक टीम वांद्रामध्ये असल्याची माहिती देखील होती.
 
एक पोस्टमध्ये त्याने 18 एप्रिलपर्यंत रेल्वे सुरू न झाल्यास देशव्यापी आंदोलनाचे आव्हान केले आहे. उल्लेखनीय आहे की या प्रकरणात पोलिसांनी सुमारे एक हजार लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. 
 
कोण आहे विनय दुबे
विनय यांच्या फेसबुक अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार विनय नवी मुंबईतील रहिवासी आहे. त्याने स्वत:ला उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हटले आहे. फेसबुकवर विनय यांनी अनेक पोस्ट शेअर केलेले आहेत ज्यापैकी एका व्हिडिओत त्यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी 40 बसेसची व्यवस्था केल्याचे म्हटले आहे ज्याने या मजुरांना नि:शुल्क त्यांच्या गावी पोहचण्याची व्यवस्था बद्दल बोलताना दिसत आहे. राज्य सरकाराकडे याबद्दल मागणी केली असून त्यांनी परवानगी न दिल्याचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ 15 हजारापेक्षा अधिक वेळा शेअर करण्यात आला आहे. 
 
राज ठाकरेंसोबत मंचावर
विनयच्या फेसबुक अकाउंटमध्ये अपलोड फोटोजमध्ये एकात स्वत: राज ठाकरेंसोबत मंचावर दिसत आहे. याव्यतिरिक्त प्रोफाइलमध्ये अपलोड एका फोटोत विधानसभा निवडणूकीची उमेदवारी प्रस्तुत करताना दिसत आहे. 
 
बड्या नेत्यांशी जवळीक संबंध
राज ठाकरेंसोबत मंचावर दिसत असलेल्या विनय दुबेंचे बड्या नेत्यांशी चांगले संबंध आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काही ट्विट केले आहेत ज्यापैकी एकात त्यांची सत्ताधारी पक्ष सहयोगी एनसीपीच्या नेत्यांशी जवळीक संबंध असल्याचे कळून येत आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी आपल्या वडिलांनी करोनाच्या विरुद्ध लढाईत आपली आविष्यभराची पुंजी महाराष्ट्र सरकारला दान करण्याबद्दल माहिती आहे. त्यांनी हे स्वीकारण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आभार असल्याचे म्हटले आहे.