परप्रांतीय मजूरांना मुख्यमंत्र्याचे आवाहन, लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही
लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही. परप्रांतीय कामगारांनी, मजुरांनी गावी जाण्याची घाई करु नये. अजिबात घाबरण्याचे काम नाही, राज्य सरकार तुमची संपूर्ण व्यवस्था करत आहे आणि पुढेही करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परप्रांतीय मजुरांना दिलासा दिला.
आज वांद्रे स्टेशनवर मजुरांचा जमाव झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मजुरांनी गावी जाण्यासाठी गाडी सुरु करण्याची मागणी केली होती. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ठाकरे सरकारनी यावर आपली स्पष्ट भूमिका हिंदी भाषेत मांडत म्हटले की काळजी का करत आहात, तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या दरम्यान त्यांनी हे देखील म्हटले की अशा संकटाच्या काळात कोणीही राजकारण करणार असेल तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही.