मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (14:55 IST)

मुंबई विमानतळावर महिलेचा एअर इंडिया एक्स्प्रेसच्या काउंटरच्या महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला

mumbai airport
मुंबई विमानतळावर 1 सप्टेंबर रोजी एका महिला प्रवाशाने एअर इंडियाच्या एक्स्प्रेस काउंटरवर महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करत हल्ला केला. ड्युटी मॅनेजर ने महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने मंगळवारी निवेदन दिले त्यात त्यांनी सांगितले, 1 सेप्टेंबर रोजी एका महिला प्रवाशाने मुंबईच्या विमानतळावर ग्राउंड ऑपरेशनच्या सताड सदस्यांशी गैरवर्तन केले. ड्युटी मॅनेजरने या प्रकरणाची माहिती सीआयएसएफ ला दिली आणि मानक कार्यप्रणालीनुसार, महिला प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

मुंबई विमानतळावरील एअर इंडिया एक्सप्रेसच्या काउंटरवर एका महिला प्रवाशाने महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला.असून महिला प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली. मुंबई विमानतळावरील या घटनेत प्रवासी आणि कर्मचारी दोघेही महिला असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
Edited by - Priya Dixit