शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (11:46 IST)

कल्याणमध्ये कपडे चोरताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कल्याण मध्ये कपडे चोरणारी महिला टोळी सक्रिय झाली असून तब्बल 32 हजाराचे कपडे चोरताना टोळीतील महिला चोरी करताना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. या टोळीत पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. काही दिवसांनी स्टॉक कमी असल्यानं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावरून घडलेला प्रकार समजला. 
 
कल्याण पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केशाज लेडीज गारमेंट मध्ये संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास काही महिला आणि पुरुष कपडे खरेदी करण्यासाठी शिरले आणि त्या टोळीतील काही महिलांनी दुकानाचे कर्मचारींना कपडे दाखवण्यात गुंतवले आणि इतर महिलांनी रॅकमधील ठेवलेल्या कापडाचे बंडल चोरले. त्या महिलांनी तब्बल 32 हजाराचे नवे कोरे कपड्यांवर हात साफ केला आहे. त्यांची ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस सीसीटीव्ही च्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.  या संपूर्ण घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग धास्तावले आहे.