शुक्रवार, 1 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 28 मे 2022 (12:53 IST)

वसईत पैठणी चोरताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सध्या दुकानांवर चोऱ्यांचे प्रकार सर्रास वाढले आहे.सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखील काही चोरटे दुकानातील वस्तू सर्रास चोरतात. वसईत अशीच एक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वसईत एका साडीच्या दुकानात दोन महिलांनी सुमारे 90 हजाराच्या पैठणी साड्यांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना शुक्रवारी 27 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वसईतील स्टेला संकुलात सद्‌गुरुज हातमाग साडीच्या दुकानात घडली आहे. या दुकानात दोन महिला लग्नाची खरेदी करण्यासाठी आल्या आणि दुकानाचे मालक चेतन भट्ट यांना भुरळ पडून गंडवून साड्या चोरल्या. साडी पसंत करताना अतिशय हुशारीने एका महिलेने दुकानाच्या मालकाचे लक्ष वेधले आणि दुसरीने दुकानदाराने दाखवलेली साडी आपल्या साडीच्या आत लपवली.

असं करत या दोघींनी दुकानाच्या मालकाला गंडवून नऊ सिल्क पैठणी साड्या ज्यांची किंमत सुमारे 90 हजाराची आहे. चोरुन नेल्या. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सीसीटीव्ही केमेऱ्यातील कैद झालेल्या फुटेजच्या आधारे दुकान मालकाने पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास करत आहे.