सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (16:29 IST)

ठाण्यात रस्त्याच्या मधोमध लाकडी होर्डिंग पडले, अनेक वाहनांचे नुकसान, दोघे जखमी

Thane Hording Collapse
कल्याणच्या सहजानंद चौकात आज शुक्रवारी सकाळी लाकडी होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले.  या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये हे होर्डिंग रस्त्याच्या मधोमध पडताना दिसत आहे. अपघातात दोघे जखमी झाले आहे. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. 
 
हा व्हिडीओ एका वृत्तसंस्थेने शेअर केला असून या मध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. पावसापासून वाचण्यासाठी लोक दुकानात उभे आहे. 
दरम्यान एका लाकडी होर्डिंग कोसळते. त्याखाली उभे असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
सुदैवाने पाऊस येत असल्यामुळे लोकांनी ठीक ठिकाणच्या दुकानात विसावा घेतला होता. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. 

होर्डिंग कोसळल्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या भागातील वाहतूक बंद करण्यात आली होती. होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमनदलांच्या जवानांनी घटनास्थळी हजर होऊन कामाला लागले. 
 
या पूर्वी मे महिन्यात मुंबईत बेकायदा होर्डिंग कोसळून 14 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि 74 जण जखमी झाले होते. हे होर्डिंग बेकायदेशीर बीएमसीच्या परवानगी शिवाय लावण्यात आले होते. 
Edited By- Priya Dixit