1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Youth killed in Mumbai local train over argument

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

crime
मुंबईच्या चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादानंतर २२ वर्षीय मयंक लोहारची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
 
मुंबई लोकल ट्रेनमध्ये दरवाजावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा मृत्यू झाला. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय मयंक लोहारची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मयंक फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होता. त्याने एका प्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले, ज्यामुळे दरवाजा उघडा ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
 
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनमध्ये वाद विकोपाला गेला आणि आरोपीने मयंकवर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मयंकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.  
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा