शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

राज ठाकरे यांना अटक करा-पासवान

बिहार व उत्तर प्रदेशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी केली आहे.

NDND
महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेशचा स्थापना दिन आणि छट पूजा करण्यावर राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. बिहारमध्ये तर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे आता पासवान यांनी वरील मागणी केली आहे.

राज यांची विधाने सामाजिक विद्वेष निर्माण करणारी असून त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. शिवसेनासुद्धा धार्मिकतेच्या आधारावर देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकजनशक्ती पार्टीने दिल्लीत राज यांच्या विधानाविरोधात मोर्टा काढला व त्यांच्या अटकेची मागणी केली. कुणाच्याही धार्मिक बाबींमध्ये कुणी हस्तक्षेप करू नये. असे झाल्यास राज दिल्लीत राहून तेथे गणेश चतुर्थी साजरी करत असतील, तर त्यांनाही विरोध करण्यात येईल, असेही पासवान यांनी म्हटले.

राज यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. कॉंग्रेसने राज यांनी या अतिशय आक्षेपार्ह असलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती.