मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 23 जुलै 2016 (11:51 IST)

राष्ट्रगीत चुकीचं म्हटल; सनी लिओनी विरोधात तक्रार!

sunney leon
प्रो-कबड्डी लीगच्या जयपूर पिंक पँथर आणि दबंग दिल्ली या सामन्यादरम्यान राष्ट्रगीतात चुकीच्या शब्दांचा वापर केला म्हणून सनी लिओनींवर दिल्लीत अशोक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रार दाखल करणाऱ्या उल्लास याच्यामते राष्ट्रगीत सुरु असताना कॅमेरा इकडे तिकडे जात होता. भारतीय राष्ट्रगीताचा किमान ५२ सेकंदापर्यंत सन्मान केला पाहिजे. सनीने राष्ट्रगीत गाताना सिंध ऐवजी सिंधु असा उच्चार केला होता. आणि हा उच्चार चुकिचा आहे. दरम्यान सनीने राष्ट्रगीत झाल्यानंतर ट्विट करत आपल्या भावना मांडल्या होत्या. ट्विट मध्ये ती म्हणाली होती, राष्ट्रगीत गायल्याचा मला गर्व आहे. राष्ट्रगीत गाताना मी थोडीसी नर्वस झाली होती. राष्ट्रगीत म्हणण्यासाठी आधी मला सराव करावा लागला होता.