मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (09:31 IST)

येत्या १० सप्टेंबरला काँग्रेसकडून भारत बंदचे आवाहन

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींचा निषेध म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने भारत बंदचे आवाहन केले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिल्याचे सांगितले. काँग्रेसच्या या बंदमध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांनी सामाजिक संघटनांनी तसेच अन्य कार्यकर्त्यानी सहभागी व्हावे असे सुरजेवाला यांनी सांगितले. हा बंद सकाळी ९ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही. वाढत्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.