सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (08:51 IST)

अयोध्येत राममंदिरात नैवेद्यासाठी तब्बल १ लाख ११ हजार लाडू तयार होणार

अयोध्येत राममंदिराच्या नैवेद्य आणि प्रसादासाठी मणिराम दास यांच्या छावणीकडून तब्बल १  लाख ११  हजार लाडू तयार करण्यात येत आहेत. हे लाडू दुतावासांमार्फत जगभरात पाठवले जाणार आहेत, अशी माहिती तेथील सेवकाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. मंदिराच्या भूमिपूजनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मंदिराच्या पूजेसाठी तयार करण्यात येत असलेले हे लाडू नैवेद्य दाखवल्यानंतर जगभरातील मठ आणि मंदिरात पाठवले जातील.

तीन ऑगस्टला राम जन्मभूमी परिसरात पंडितांची एक टीम अनुष्ठान आणि गणेश पूजेच्या कार्यक्रमाची सुरुवात करेल. अयोध्येत ५ ऑगस्टला सकाळी ८  वाजल्यापासून पूजन आणि अनुष्ठान सुरु होईल. काशीच्या विद्वान ११  पंडितांच्या टीमकडून हे पूजन केले जाईल. हीच टीम नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करणार आहे, असे राम जन्मभूमी तीर्क्ष क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले.