मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:09 IST)

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश

राज्यसभेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदारांवर मोठी कारवाई केली आहे. सोमवारी सभागृहाने शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि तृणमूलच्या खासदार डोला सेन यांच्यासह 12 सदस्यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित केले. पावसाळी अधिवेशनात (11 ऑगस्ट) अनुशासनहीनता पसरवल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
 
प्रियांका चतुर्वेदी आणि डोना सेन यांच्याशिवाय सोमवारी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये एलराम करीम (सीपीएम), काँग्रेसच्या फुलो देवी नेताम, छाया वर्मा, आर बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग, सीपीआयचे बिनॉय विश्वम, टीएमसीच्या शांता छेत्री आणि शिवसेनेचे अनिल देसाई यांचा सहभाग आहे. 11 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी त्यांच्या हिंसक वर्तनाने आणि सुरक्षा कर्मचार्‍यांवर जाणूनबुजून हल्ले करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे, असे निलंबनाच्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
 
राज्यसभेने केलेल्या कारवाईवर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, "जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास, पुरुष मार्शलने महिला खासदारांना कसे मारहाण केली हे रेकॉर्ड केले आहे. हे सगळं एकीकडे आणि तुमचा निर्णय दुसरीकडे? हे कसले असंसदीय वर्तन आहे? त्यांच्यासाठी वकीलही दिले जातात. कधी-कधी त्यांची बाजू घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पाठवले जाते, पण इथे आमची भूमिका घेतली जात नाही.