संबंधित माहिती
- दौसा येथे हरिद्वारहून इंदूरला जाणाऱ्या बसला आग, ८ प्रवाशांचा मृत्यू
- राजस्थानला रेल्वेची एक मोठी भेट! खाटूश्यामजी स्थानकासह पाच नवीन रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार
- कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये एका व्यक्तीने कानशिलात लगावली
- बिकानेरमध्ये ६ गर्भवती महिलांचे किडनी निकामी झाले!
- राजस्थान धुळीचे वादळ, व्हिडीओ व्हायरल
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे १३ वर्षांच्या मुलीवर ३२ नराधमांकडून सामूहिक बलात्कार
राजस्थानमध्ये एका १३ वर्षांच्या निष्पाप मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. १८ जून रोजी मुलीचे अपहरण करून त्यानंतर ३२ पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधून एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये एका १३ वर्षांच्या निष्पाप मुलीचे अपहरण करून ३२ पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघडकीस येताच लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर प्रशासनाने ज्या तीन हॉटेल्समध्ये मुलीवर हा भयानक अत्याचार झाला होता, ती बुलडोझरने पाडली.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
माहितीनुसार एका रिक्षाचालकाने १८ जून रोजी मुलीचे अपहरण केले. त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला हॉटेल मालकांना विकले. त्यानंतर, पुढील पाच दिवस या निष्पाप मुलीवर तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सामूहिक बलात्कार झाला. तसेच पोलिसांनी २३ जून रोजी एका हॉटेलमधून मुलीची सुटका केली. बारा जणांना अटकही करण्यात आली.
श्री गंगानगरच्या पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिले की, या प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल आणि या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होईल व गुन्हेगारांना कठोरतम शिक्षा दिली जाईल.
Edited By- Dhanashri Naik