शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:40 IST)

एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार, मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना भेट

modi farmers
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi मोदी सरकार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपये हस्तांतरित करू शकते. पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा 11वा हप्ता येणार असून केंद्र सरकारने पीएम किसान योजना 2021 मध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत  शेतकऱ्यांना आता 11 व्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करावे लागेल. म्हणजेच आता 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक नवीन नियमांसह अर्ज करावा लागेेल.
 
मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 थेट जमा करते. हे पैसे सरकार 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देत असते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात.
 
शेतकर्‍यांना हे काम करावे लागेल- 
पीएम किसान योजनेंतर्गत ई-केवायसी पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजेच 11 व्या हप्त्याचे पैसे मिळतील. ई-केवायसी शिवाय हप्ता अडकू शकतो. घरबसल्या ई-केवायसी करता येते.
यासाठी PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
येथे तुम्हाला प्रथम शेतकरी कोपऱ्यावर eKYC ची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल.
येथे तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबर टाका, इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की तुम्हाला तोच नंबर टाकावा लागेल जो आधारशी लिंक आहे.
त्यानंतर OTP टाका. त्यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल. तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करण्यात काही अडचण आल्यास तुम्ही आधार सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.