गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (08:36 IST)

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले

206 Stones were removed from the patient's kidney रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले
हैदराबादमधील अवेअर ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडातून 206 खडे काढण्यात आले. रुग्णाला सहा महिन्यांहून अधिक काळपासून कंबरेत डाव्या बाजूस तीव्र वेदना होत होत्या, जे उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे आणखीनच वाढले. त्यानंतर नलगोंडा येथील रहिवासी वीरमल्ल रामलक्ष्मीय्या यांनी 22 एप्रिल रोजी अवेअर ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलशी संपर्क साधला. किडनीतील खडे कीहोल शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी काढले. वीरमल्ल रामलक्ष्मीय्या स्थानिक डॉक्टरांकडून औषध घेत होते, ज्यामुळे त्यांना काही काळ वेदना कमी झाली.
 
 या वेदनांचा त्याच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होत होता आणि त्यांना आपल्या दैनंदिन व्यवहार करण्यात देखील त्रास होत होता. रुग्णालयातील डॉ. पूल नवीन कुमार, वरिष्ठ सल्लागार यूरोलॉजिस्ट, म्हणाले, "प्राथमिक तपासणी आणि अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये एकाधिक डाव्या किडनी कॅलिक्युली (डाव्या बाजूला किडनी स्टोन) ची उपस्थिती दिसून आली आणि सीटी केयू बी स्कॅनद्वारे याची पुष्टी झाली." 
 
डॉक्टरांनी सांगितले की रुग्णाचे समुपदेशन करण्यात आले आणि त्याला एक तासाच्या की-होल शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. शस्त्रक्रिये दरम्यान सर्व 206 दगड काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. 
 
उन्हाळ्यात जास्त तापमानात शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मूत्रपिंडात खडे तयार होतात. हायड्रेटेड राहण्यासाठी लोकांनी जास्त पाणी आणि शक्य असल्यास नारळाचे पाणी जास्त प्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला. तसेच, लोकांनी कडक सूर्यप्रकाशात प्रवास करणे टाळावे किंवा कमी प्रवास करावा आणि सोडा असलेले पेये घेऊ नयेत.