शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (10:47 IST)

पुलवामात चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू- पुलवामामध्ये सुरक्षाबल जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर चकमकीदरम्यान एक जवानही शहीद झाला आहे. याव्यतिरिक्त 1 नागरिक आणि दोन जवान जखमी झाले आहेत.
 
क्षेत्रात सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. दहशतवादी एका घरात लपलेले असल्याची बातमी आहे.
 
गुप्त माहितीच्या आधारे पोलिस आणि लष्कराने शोधमोहिम सुरु केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी अचानग गोळीबार सुरु केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या चममकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
 
जम्मू काश्मीरमध्ये 12 मे रोजी झालेल्या चममकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले होते. त्याआधी 10 मे रोजी देखील एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं गेलं होतं.