1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
  4. 401 खासदारांकडून मालमत्ता घोषित नाही

401 खासदारांकडून मालमत्ता घोषित नाही

Marathi Samachar
राहुल गांधी, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी आणि केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांच्यासह 401 खासदारांनी अद्यापही मालमत्तेबाबत सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही.
 
सभागृह सचिवालाकडे 26 सप्टेंबर्पत मालमत्तेची सविस्तर माहिती देण्याची आवश्कता होती, असे माहिती अधिकाराच प्रतुत्तरात म्हटले आहे.
 
माहिती अधिकाराखाली विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा सचिवालाने म्हटले आहे की, 401 खासदारांच मालमत्तेची सविस्तर माहिती 26 सप्टेंबर्पत मिळालेली प्रतीक्षा होती. शपथ घेतल्यानंतर 90 दिवसांत सदस्याने त्यांच्या मालमत्तेचे सविस्तर विवरण देणे आवश्क असते. 2004 रोज झालेल्या लोकसभा मालमत्ता घोषित निमानुसार 90 दिवसांत मालमत्ता घोषित करणे प्रत्येक सदस्याला बंधनकारक आहे.
 
परंतु शपथ घेऊनही 90 दिवसांच आत म्हणजे 26 सप्टेंबर्पत मालमत्तेची सविस्तर माहिती न दिलेल्या सदस्यांमध्ये केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज, उमा भारती, नितीन गडकरी, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलामसिंह यादव यांचा समावेश आहे. मालमत्तेची सविस्तर माहिती सादर न केलेल्या सदस्यांची संख्या पक्षनिहाय पुढीलप्रमाणे आहे- भाजप (209), काँग्रेस (31), तृणमूल काँग्रेस (27), बिजेडी (18), शिवसेना (15), तेलुगूदेशम (14), अण्णाद्रमुक (9), तेलंगणा राष्ट्र समिती (8), वायएसआर काँग्रेस (7), लोकजनशक्ती पार्टी (6), राष्ट्रवादी (4), माकप (4), सप (4), अकाली दल (3), राजद (3), आप (3), संयुक्त जनता दल (2), अपना दल (2).
 
मालमत्तेची सविस्तर माहिती सादर न केलेल्या मंत्र्यांमध्ये हर्षवर्धन, राधा मोहनसिंग, अनंत गिते, अनंतकुमार, रामविलास पासवान यांचा समावेश आहे. तसेच अमरिंदर सिंह, विरप्पा मोईली, मेहबुबा मुफ्ती, उपेंद्र कुशावाह, किरण रिजीजू, सुप्रिया सुळे यांनीही अद्याप मालमत्तेची माहिती दिली नाही.
About Writer
wd