गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (13:17 IST)

नोएडामध्ये शाळेत 6 वर्षीय मुलीचा विनयभंग

Uttar Pradesh News
उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत 6 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच शाळेतील बांधकाम मजुरावर हा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मंगळवारी सकाळी त्यांची मुलगी शाळेच्या आवारात खेळत होती आणि त्याचवेळी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या बांधकामात गुंतलेल्या एका मजुराने मुलीला वाईट हेतूने स्पर्श केला. याला मुलीने विरोध करत शाळेत शिक्षकांना याची माहिती दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच ही माहिती प्राचार्य आणि व्यवस्थापनापर्यंतही पोहोचल्याचा त्यांचा दावा आहे. पण शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

Edited By- Dhanashri Naik