रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (16:08 IST)

धक्कादायक! मथुरेत 3 महिन्यांच्या वासरूवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीला अटक

calf
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एका 3 महिन्यांच्या वासरूवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 
त्या वासरूच्या मालकाने आल्यावर वासरूला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. त्याने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

सदर घटना गुरुवारी मथुरा जिल्ह्यातील जमुनापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोशन विहार कॉलोनीत घडली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या गायीने 3 महिन्यांपूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला. हा व्यक्ती सकाळी जनावरांना चारण्यासाठी गेला असता शेजारी राहणार एक तरुण आला आणि त्याने मद्यधुंद अवस्थेत एकटा असलेल्या वासरावर लैंगिक अत्याचार केले.तो घरी आल्यावर त्याने वासरूला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर धक्काच बसला. त्याने शेजारी लोकांना चौकशी केल्यावर आरोपी तरुणाने हे कृत्य केल्याचे समोर आले. 

त्या व्यक्तीने तातडीनं पोलीस ठाणे गाठून घडलेले सर्व पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या वर आरोपीला अटक केली. आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली दिली.या घटनेमुळे गोरक्षण गट संतप्त झाला असून त्यांनी या तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
Edited by - Priya Dixit