शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (19:04 IST)

बुलंदशहरमध्ये 6 वर्षाच्या मुलीवर आणि शेळीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

minor
यूपीमधील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सरकारी अधिकाऱ्यावर 6 वर्षांच्या निष्पाप मुलीवर आणि एका शेळीवर बलात्कार केल्याचा आरोप असून आरोपी सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे.आरोपी व्यक्ती शिकारपूर ब्लॉकमध्ये एडीओ कृषीपदावर कार्यरत आहे. 

आरोपीने 6 वर्षाच्या चिमुकलीवर आणि शेळीवर बलात्कार केल्याची घटना बुलंदशहर जिल्ह्यातील अहमदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.हे अधिकारी एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आले होते.त्यांनी आधी चिमुकलीवर अत्याचार केला नंतर जवळच बांधलेल्या शेळीवर अत्याचार केला.मुलीची अवस्था पाहता कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. 

मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोणीतरी या घटनेचा व्हिडिओही बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. निष्पाप मुलीची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
Edited by - Priya Dixit