1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (11:48 IST)

जळगांव : आरोपीला नागरिकांच्या ताब्यात द्या ही मागणी करीत पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ, अनेक पोलीस कर्मचारी जखमी

जळगांवमध्ये लहान मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीला नागरिकांच्या ताब्यात द्या या मागणीला घेऊन लोकांनी थेट पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. 
 
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर मध्ये एक भयंकर बातमी समोर आली आहे. एका 30 वर्षीय व्यक्तीने सहा वर्षाचा मुलीचा बलात्कार करून तिला जीवे मारले. सूचना मिळताच पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी करत एकच गोधळ केला. लोकांची मागणी होती की आरोपीला आमच्या ताब्यात द्या. रागात असलेल्या जमावाने पोलीस स्टेशनवर दगड फेक केली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी एका सहा वर्षाचा मुलीचा बलात्कार करून आरोपीने तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी फरार असलेल्या या आरोपीला 20 जून ला भुसावळ जवळील तापी नदीजवळ अटक केली. लोकांना समजले की आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोकांनी पोलीस स्टेशन बाहेर जमा होत आरोपीला लोकांच्या ताब्यात द्या असा आग्रह धरला. व पोलिसांनी या मागणीला नकार दिल्याने लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गोंधळ घातला. नंतर दंगा नियंत्रण कर्मचारी आल्याने स्थिती नियंत्रणात आली.