सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (10:03 IST)

पुणे : पाईपमध्ये अडकली होती साडी, वाटर टँकर मध्ये आढळला महिलेचा मृतदेह

death
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एक घटना समोर अली आहे. फुरसुंगी परिसरात एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ झाला आहे. सूचना मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाहेर कडून ताब्यात घेतला व पोस्टमोर्टमसाठी पाठवला. या महिलेची ओळख कौशल्या मुकेश चव्हाण अशी झाली आहे. 
 
फुरसुंगी पावर हाऊस परिसरात सकाळी पाण्याचा टँकर आला होता. स्थानीय लोकांनी टँकरमधून पाणी भरण्यास सुरवात केली. पण काही वेळेनंतर पाणी बंद झाले. म्हणून टँकर चालकाने पहिले तर साडी फसलेली होती. ज्यामुळे पाणी येणे बंद झाले होते. मग चालकाने टँकर वर चढून आतमध्ये पहिले तर एका महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये होता. हे पाहताच सर्वांना धक्का बसला. 
 
पोलिसांनी आलेल्या माहितीनुसार ही महिला उत्तर प्रदेशची राहणारी आहे. तसेच एक महिन्यापूर्वी ती कुटुंबासहित पुण्यामध्ये आली होती. तसेच चौकशी दरम्यान समजले की, या महिलेला मानसिक आजार होता ज्याचा उपचार सुरु होता. शंका व्यक्त करण्यात आली आहे की या महिलेले आत्महत्या केली आहे कारण पोलिसांना मृतदेहावर दुखापत मिळाली नाही.