मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (11:27 IST)

मुलीला CBSC शिक्षण देऊ शकत नाही याची खंत म्हणून महिलेची मुलीसह आत्महत्या

सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) मान्यता प्राप्त शाळेमध्ये  मुलीला शिकवू शकत नाही याची खंत महिलेला सतत विचार करायला लावत होती. यामुळे त्रस्त महिलेने टोकाचे पाऊल उचलेले. या महिलेले आपल्या मुलीला सोबत घेत विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. 
 
महाराष्ट्रातील लातूर मध्ये एका महिलेने आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले की ही महिला भाग्यश्री आपल्या मुलीला आणि मुलाला CBSC मध्ये शिक्षण देऊ इच्छित होती पण तिच्या आर्थिक परिस्थितीला ते झेपावत न्हवते. आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती यामुळे त्रस्त महिलेले हे टोकाचे पाऊल उचलले. 
 
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला सतत उदास राहायची कारण आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी महिलेचे तिच्या पतिशी व्हिडीओ कॉल वर बोलणे झाले. त्यानंतर तिने पाच वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्या केली.