1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (11:05 IST)

शाळेमध्ये लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टिचरला हाय कोर्टाने दिला निर्णय

महारष्ट्रातील एका सरकारी शाळेमध्ये लहान मुलींचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रकरणात मुंबई हाय कोर्टाने आरोपी टिचरला पाच वर्षाची जेल ही शिक्षा सुनावली आहे. रत्नागिरीमध्ये एका प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला जिल्हा कोर्टाने पाच वर्षाची जेल ही शिक्षा ठोठावली होती. त्याच्यावर विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. 
 
जस्टीस किशोर कांत च्या पीठाने रत्नागिरी कोर्टच्या आदेशाविरोधात एका अपिलवर सुनावणी करत होती. ज्यामध्ये टिचरची शिक्षा कायम करण्यात आली आहे. कोर्टाने आरोपीला POCSO एक्ट अंतर्गत दोषी ठरवले आहे. आरोपी टीचर 14 वर्षांपासून शाळेमध्ये नोकरी करीत होता.  
 
या घटनेबद्दल जेव्हा विद्यार्थिनींच्या कुटुंबांना समजले तेव्हा त्यांनी सरपंचाला सांगितले. मग यांनतर शिक्षण विभागात आरोपी बद्दल तक्रार नोंदवली. यानंतर 8 जानेवारी 2022 ला एफआईआर नोंदव्यात आली. नंतर आरोपीवर आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी टिचरला 5 वर्षाची जेल देण्यात आली. तसेच आता हाय कोर्टाने ही शिक्षा पुढे अशीच सुरु राहील असा निर्णय दिला आहे.