7 रेस कोर्स नाही तर 7 एकात्म मार्ग
देशाचे पंतप्रधान जेथे राहतात तो ७ रेस कोर्स परिसर आहे राजधानी दिल्ली येथे. मोदी सरकार आले आणि त्यांनी अनेक आयोगाची नावे बदलली.आता पुन्हा केद्र शासन ७ रेस कोर्सच नाव बदलवून लवकरच ७ एकात्म मार्ग असे ठेवणार आहे.
एनडीएमसी अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी मागणी केली आहे. मीनाक्षी यांनी याप्रस्तावात पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नामकरण ‘7 रेसकोर्स रोड’ ऐवजी ‘7 एकात्म मार्ग’ कराव असे म्हटले आहे.
संबंधित परिसर एनडीएमसी अंतर्गत येतो आणि मीनाक्षी लेखीही याच्या सदस्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आणि एकात्मतेच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या रस्त्याचं नामकरण ‘7 एकात्म मार्ग’ करावं असं त्यांनी मत मांडले आहे.
भारतीय संस्कृतीशी सुसंगत असे ‘7 रेसकोर्स रोड’ हे नाही.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीभेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते बुधवारी होणाऱ्या बैठकीला हजर राहणार नाहीत. त्यामुळे मीनाक्षी लेखी यांच्याकडे नगर परिषदेचं अध्यक्षपद असेल. अशा परिस्थितीत पंतप्रधान निवासाचं नवीन नामकरण निश्चित होणार आहे.
