शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (11:39 IST)

गणेश विसर्जनाच्या वेळी 8 जणांचा बुडून मृत्यू

water death
गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या वेळी शुक्रवारी नदीत बुडून आठ जणांचा मृत्यू झाला. तसेच अग्निशमन विभागाच्या जवानांनी सांगितले की, देहगाम तालुक्यातील वसना सोगठी गावाजवळील मेश्वो नदीत दुपारी नऊ जण गणेश विसर्जन करत होते. यादरम्यान आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
 
तसेच या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आठ जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आणि पोस्टमोर्टमकरीत पाठवण्यात आले.

तसेच मृतांची ओळख अजून पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आवश्यक कारवाई सुरू केली आहे.