रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (17:56 IST)

हिमाचलमध्ये भूस्खलनात टूरिस्ट कारवर दरड कोसळली,9 जण ठार

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनात दरड कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार 3 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
 
वृत्तानुसार किन्नौर जिल्हा गुंसाजवळ दरड कोसळल्याने छितकुल ते सांगलाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनावर दरड कोसळली. वाहनावर दगड पडल्याने दिल्ली एनसीआरमधील 9 पर्यटकांनी आपला जीव गमावला.
 
किन्नौरच्या सांगली खोऱ्यातबटसेरी पूल कोसळल्याच्या बातम्या आहेत. वृत्तानुसार, अपघातात जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले आहे.