गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (14:16 IST)

इंदूर मधील 16 वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेत खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

हृदयविकाराचा झटका आता किशोरवयीनांचाही बळी घेत आहे. इंदूरमध्ये एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ती 11वीची विद्यार्थिनी होती आणि शाळेत मित्रांसोबत खेळत होती. एवढ्या लहान वयात या विद्यार्थिनीने जगाचा निरोप घेतला, मात्र दु:खाचा डोंगर उभा करूनही तिच्या कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ती इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवू शकेल.

विद्यार्थिनी वृंदा त्रिपाठी यांना कोणताही गंभीर आजार नव्हता. ती नेहमीप्रमाणे शाळेत जाऊन खेळत होती. अचानक तिच्या छातीत दुखू लागलं आणि ती श्वास घेत खाली पडली. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात असले तरी विद्यार्थिनीचा मृतदेहही शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शव विच्छेदनाच्या अहवालात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 
वृंदाच्या या जगातून अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला.या विद्यार्थिनीचे डोळे दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.वृंदाच्या मृत्यूने शाळेत शोककळा पसरली आहे. 
 
Edited By- Priya Dixit