मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2023 (11:16 IST)

चॉकलेट घशात अडकून 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

Rabpura
chocolate got stuck: चॉकलेट ,टॉफी हे लहानापासून मोठ्यांना देखील आवडतात. चॉकलेट मुळे चिमुकल्याचा जीव जाण्याची धक्कादायक घटना गौतमबुद्धनगरच्या रबपुरा शांतीनगर येथे ही दुर्देवी घटना घडली आहे.टॉफी खात असलेल्या चार वर्षाच्या मुलाच्या घशात टॉफी अडकून त्याचा मृत्यू झाला. सान्याल असे या चिमुकल्याचे नाव आहे.

चिमुकला सान्याल हा सोमवारी दुपारी दुकानातून घेऊन टॉफी खात होता.टॉफी त्याच्या घशात अडकली आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याच्या घशातून टॉफी काढण्याचे प्रयत्न केले.मात्र अडकलेली टॉफी काढता आली नाही. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले असता तिथून त्याला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र वाटेतच त्याच्या मृत्यू झाला. सान्यालच्या मृत्यूने कुटुंबियानी हंबरडा फोडला.

Edited by - Priya Dixit