शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2022 (15:40 IST)

42 वर्षीय शिक्षकाचं 20 वर्षाच्या विद्यार्थीनीवर जडलं प्रेम

प्रेम आंधळं असतं ही म्हण तुम्ही अनेकदा वाचली आणि ऐकली असेल, पण काळाच्या ओघात आजकालच्या तरुणाईने प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. म्हणूनच प्रेमाच्या अनोख्या कहाण्या समोर येत राहतात.
यातील काही घटना अशा असतात ज्या ऐकून किंवा वाचून सगळेच थक्क होतात. प्रेमाला वयाची मर्यादाही नसते, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.बिहारमध्ये मटुकनाथ आणि ज्युलीची अशीच आणखी एक प्रेमकथा समोर आली आहे. समस्तीपूरमध्ये एका शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न केले. दोघांच्या वयात 22 वर्षांचा फरक आहे. विद्यार्थिनी कोचिंगसाठी यायच्या. यादरम्यान दोघे प्रेमात पडले आणि नंतर लग्न केले. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
 
गुरुवारी दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले. आजूबाजूचे लोक लग्नाचे साक्षीदार झाले. शिक्षकाचे वय 42 वर्षे आहे, तर विद्यार्थिनीचे वय 20 वर्षे आहे. लग्नाला आलेल्या लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणाबाबत स्थानिक लोकांनी सांगितले की, श्वेता कुमारी रोजडा बाजार येथील संगीत कुमारच्या कोचिंगमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी जात होती. तेथे दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला. नंतर त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठी त्याने कोर्ट मॅरेज केले. शिक्षकाच्या पत्नीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

Edited by - Priya Dixit