शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (18:15 IST)

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

लखनौच्या ट्रान्स्पोर्टनगरच्या औषधाच्या कंपनीच्या गोदामाची इमारत कोसळली.ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पथकाने मदतकार्य सुरू केले आहे.ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहे अद्याप समजू शकले नाही. पावसामुळे इमारत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही इमारत जाडे मीठ, तेल आणि पाईप बनवणारी कंपनी आणि एक फार्मास्युटिकल कंपनीचे गोदाम होते.अपघाताच्या वेळी इमारतीत काम सुरु होते. या वेळी अनेक जण इमारतीत उपस्थित होते. इमारत अचानक कोसळल्याने मोठा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. 

स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.बचाव कार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले जात आहे.मुख्यमंत्रीनी या अपघाताची दखल घेतली आहे. एनडीआरएफची संपूर्ण टीम बचावकार्यात गुंतले आहे.  
Edited by - Priya Dixit