शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (11:14 IST)

धक्कादायक प्रकार, लखनऊ मध्ये आजारी पतीला घेऊन जाणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिकेत विनयभंग

Lucknow News
खासगी रुग्णवाहिकेत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तसेच तिच्या आजारी पतीला घरी नेण्यासाठी वाहन भाड्याने घेतलेल्या महिलेवर रुग्णवाहिका परिचराने चालकासह लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार लखनऊचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त जितेंद्र कुमार दुबे यांनी सांगितले की, आरोपी रुग्णवाहिका सहाय्यक ऋषभ याला अटक करण्यात आली आहे. तर चालक फरार असून आमचे पथक आरोपी चालकाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेचा पती लखनऊमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. पोलिसांनी सांगितले की, आर्थिक कारणामुळे महिलेने 29 ऑगस्टच्या संध्याकाळी पतीला डिस्चार्ज करून खाजगी रुग्णवाहिकेतून घरी नेण्याचा निर्णय घेतला, परंतु परत येत असताना चालक आणि सहाय्यकाने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
 
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जेव्हा तिने त्यांच्या प्रयत्नांना प्रतिकार केला तेव्हा ड्रायव्हरने गंतव्यस्थानापासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या बस्ती जिल्ह्यात रुग्णवाहिका थांबवली आणि तिला, तिचा भाऊ आणि तिच्या पतीला वाहनातून बाहेर फेकले. महिलेने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, ज्यांनी तिच्या पतीला गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यासाठी दुसऱ्या रुग्णवाहिकेची व्यवस्था केली, जिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. महिला लखनौला परतली आणि बुधवारी गाझीपूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.