बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (12:38 IST)

लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव

murder
उत्तरप्रदेशच्या मऊ येथे लग्नाच्या पाच दिवसानंतर एका नवरीने आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या घरात थाटामाटाने लग्न झालं त्या घरात शोकाकुल वातावरण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उसरी विश्वनाथपूर येथे लवकुश चौहान याचे लग्न 13 फेब्रुवारी रोजी आझमगडच्या छतावर गावातील पायल चौहानशी झालं. लग्न थाटात झालं. नंतर नवरीला घेऊन वरात घरी परतली. लग्नाचे दोन दिवस सर्व विधी आटोपले.

नंतर ते दोघे नवीन घरात राहायला गेले.  शनिवारी रात्री त्याला काही लोकांनी फोन करून आपल्यासोबत नेले. मात्र सकाळी तो घरीच परतला नाही. या नंतर पायल ने सासू -सासऱ्यांना फोन करून ही माहिती दिली.

लवकुशचा शोध घेण्यात आला तेव्हा त्याच्या मृतदेह त्यांच्या घराच्या जवळ एका तलावात सापडला. नंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली .पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा शोध लावला असता काही तासातच प्रकरणाचा खुलासा झाला.  

पायलचे एका मुलाशी  प्रेम संबंध होते. तिचे लग्न मनाच्या विरुद्ध झाल्यामुळे ती खुश नव्हती. तिने पतीची हत्या करण्याचा कट रचला तिने प्रियकर दिनेश यादव आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला. आरोपी पत्नी पायल व तिचा प्रियकर दिनेश याला पोलिसांनी अटक केली आहे.  
 
 Edited by - Priya Dixit