मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (10:40 IST)

50 प्रवाशी असलेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली, 7 ठार 45 जखमी

आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे काल रात्री झालेल्या भीषण बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवाशी होते.  तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खडकावरून 100 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. 
 
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपतीच्या एसपींनी ही माहिती दिली. मृतांमध्ये अनेक मुले आणि महिलांचाही समावेश आहे. तिरुपतीच्या एसपींनी ही माहिती दिली.50 हून अधिक लोक बसमधून तिरुपतीला साखरपुडा समारंभासाठी जात होते, परंतु कथितरित्या बस चालकाचे वळण ओलांडताना नियंत्रण सुटले आणि बस खाली दरीत कोसळली.
 
तिरुपतीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या चंद्रगिरी मंडळात घटनेनंतर लोक जमा झाले. मदतकार्य सुरू झाले. पोलिस आणि प्रशासनाच्या पथकासह बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले. रात्री अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. मात्र, रविवारी पहाटे बचावकार्य पूर्ण करण्यात आले.