मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (10:20 IST)

'कश्मीर फाइल्स सर्वांनी पाहावा म्हणजे कळेल काँग्रेसच्या काळात काय झाले' - शाह

काँग्रेसच्या काळात काश्मीर खोऱ्यातील लोकांवर काय अत्याचार झाले हे समजण्यासाठी कश्मीर फाइल्स पाहा, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

ज्या लोकांनी आतापर्यंत काश्मीर फाइल्स पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, म्हणजे त्यांना कळेल की काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होता. पण जेव्हा नरेंद्रभाई दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले त्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवले. ते अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.