मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (14:46 IST)

बिडीसाठी दारूच्या नशेत तरुणाने महिलेचा भर रस्त्यात खून केला

दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या डाबरी भागात एका महिला दुकानदाराची दारूच्या नशेत एका व्यक्तीने हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी दिलीप (45) याला अटक केली आहे दिलीप प्लंबरचे काम करतो.मयत महिला आपल्या पतीसह परिसरात किराणा दुकान चालवायची.सदर आरोपी दिलीप तिच्या दुकानातून किराणामाल घ्यायचा. 

घटनेच्या दिवशी सदर आरोपी महिलेच्या दुकानात नशेत आला आणि त्याने बिडी देण्याची मागणी केली.पूर्वीचे थकबाकी दे मगच तुला सामान मिळेल. असं महिलेने म्हटल्यावर दीघंमध्ये वादावादी झाली.आरोपीने चिडून महिलेचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
 
या मध्ये आरोपीच्या हातात टूलकिट आहे आहे.त्यातून त्याने चाकू काढून महिलेचा गळा चिरला आणि चाकू पुन्हा टूल किट मध्ये ठेवला. महिलेच्या पतीने आपल्या पत्नीला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली,थकबाकी न भरल्याने महिलेने आरोपीला बिडी देण्यास नकार दिल्याने चिडून तरुणाने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.गंभीररित्या जखमी झालेल्या 30 वर्षीय महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .या महिलेचे नाव विभा असून ती आपल्या पतीसह परिसरात किराणा दुकान चालवायची. हल्ल्यानंतर, महिलेला तिच्या पतीने रुग्णालयात नेले जेथे तिला मृत घोषित करण्यात आले,मयत महिलेचे नाव विभा आहे. ती किराणा दुकान चालवायची. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या जवळून धारदार शस्त्र  जप्त केले आहे.