सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (10:44 IST)

लखीमपूर खिरी : 'शेतकऱ्यांना चिरडण्याच्या' घटनेचा कथित व्हीडिओ व्हायरल

लखीमपूर खिरीमधल्या तिकुनियामध्ये झालेल्या घटनेचा तथाकथित व्हीडिओ व्हायरल झालाय.काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रांनीही एक व्हीडिओ ट्वीट केलाय. हा व्हीडिओदेखील व्हायरल झालेला आहे.
 
हा व्हीडिओ ट्वीट करत प्रियांकांनी म्हटलंय, "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डर वा FIR शिवाय गेल्या 28 तासांपासून अटकेत ठेवलंय. अन्नदात्याला चिरडणाऱ्या या व्यक्तीला अजून अटक झालेली नाही. असं का?"

तिकुनियामध्ये जिथे ही घटना घडली, तिथला हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जातंय. रस्त्यामध्ये उभ्या असणाऱ्याला लोकांना चिरडून एक थार (Thar) जीप वेगाने पुढे जात असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसतं. या जीपमध्ये काही लोक बसल्याचंही व्हीडिओत दिसतं.
 
या जीपच्या मागून एक फॉर्च्युनर गाडी येताना दिसते. आपलं म्हणणं या व्हीडिओमुळे सिद्ध होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण पोलीस या व्हीडिओचा त्यांच्या तपासात समावेश करून घेतात का, हे आता पाहायला हवं.
 
सोमवारी रात्री व्हॉट्सअॅप आणि फेसबुक बंद पडल्याने हा व्हीडिओ तितकासा पसरला नव्हता. पण मंगळवार ( 5 ऑक्टोबर) सकाळपासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.तर लखीमपूर खिरीमधली इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.