शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (10:10 IST)

दिल्लीतील ओखला येथील कपड्यांच्या गोदामात भीषण आग लागली,अग्निशमन दलाचे 18 बंब घटनास्थळी पोहोचले

दिल्लीच्या ओखला फेज -2 मधील हरकेश नगरमधील कपड्यांच्या गोदामात शुक्रवारी पहाटे 3.45 वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 18 बंब घटनास्थळी पोहोचले  आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व दिल्लीतील एका गोदामात शुक्रवारी पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिल्ली अग्निशमन सेवांचे संचालक यांनी सांगितले की, ओखला फेज -2 च्या संजय कॉलनीमध्ये पहाटे 3:51 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर घटनास्थळी 18 अग्निशमन दलाचे बंब पाठवण्यात आले.
ते म्हणाले की, इमारतीच्या तळघर, तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कापूस, दोरे  आणि कापडाचे तुकडे ठेवलेले होते. ते म्हणाले की आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही