गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जून 2024 (15:48 IST)

मुंबईच्या विमानतळावर मोठा अपघात टळला, दोन विमान जवळ आले

flight
social media
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (मुंबई विमानतळ) एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर दोन विमानांच्या दरम्यान मोठा अपघात झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक विमान लँडिंग करत होते तर दुसरे विमान टेक ऑफ करत असताना धावपट्टीवर दोन्ही विमान जवळ आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो आणि एअर इंडियाची फ्लाइट रनवेवर एकमेकांच्या अगदी जवळ आली होती. त्यावेळी दोघेही एकमेकांवर आदळतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र दोघेही या टक्करातून थोडक्यात बचावले.
 
घटनेनुसार, इंडिगोचे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत होते, तर एअर इंडियाचे विमान टेकऑफसाठी धावपट्टीवर धावत होते. समोर आलेला 14 सेकंदांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही आपला श्वास रोखू शकतो.या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या मध्ये एक फ्लाईट रनवेवर उतरताना दिसत आहे तर दुसरी फ्लाईट टेक ऑफ करत आहे. 

सदर घटना शनिवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक 27 वर घडली, जेव्हा इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून येणारे इंडिगोचे फ्लाइट 6E 5053 धावपट्टीवर उतरले, त्याचवेळी एअर इंडियाचे फ्लाइट AI657 तिरुअनंतपुरम विमानतळासाठी उड्डाण करण्याच्या प्रक्रियेत होते. या विमानांची धडक थोडक्यात चकली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला.या प्रकरणात डीजीएस ने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या वर संतप्त प्रतिक्रिया देत आहे. 

Edited by - Priya Dixit