रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (13:28 IST)

भटक्या कुत्र्यांनीं लचके तोडत सहा वर्षाच्या मुलाचा घेतला जीव

हैद्राबाद मधून एक बातमी सामोरे आली आहे. भटक्या कुत्र्यांनी घराजवळ शौच्चालयास बसलेल्या एका सहा वर्षाच्या मुलावर हल्ला केला व लचके तोडत त्याचा जीव घेतला.  
 
संगारेड्डी जिल्ह्याच्या पटानचेरु मध्ये भटक्या कुत्र्यांनी सहा वर्षाच्या मुलावर हल्ला करीत त्याचा जीव घेतला. हा मुलगा एक डंप यार्ड जवळ शौच्चालयास बसला होता. तेव्हा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. मुलाचे कुटुंब बिहारचे राहणारे आहे. तसेच मजुरी करून उदरनिर्वाह करत. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.  देशात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षभरात कुत्र्यांच्या हल्ल्यात 11 लहान मुलांचा जीव गेला आहे.