मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (12:45 IST)

महाराष्ट्र : पायांच्या ऐवजी प्रायव्हेट पार्टची केली सर्जरी, मेडिकल अधीकारी म्हणाले-यामध्ये चुकीचे काहीच नाही

operation
महाराष्ट्रातील ठाणे मध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. शहापूर मधील 9 वारशाच्या मुलाच्या पायाला जखम झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. मुलाच्या पालकांचा आरोप आहे की डॉक्टरांनी त्यांच्या पाय ऐवजी प्रायव्हेट पार्टची सर्जरी केली. या प्रकरणात तक्ररीनंतर एक आरोग्याधिकारींनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तर पोलीस चौकशी करित आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या पालकांनी सांगितले की, गेल्या महिन्यामध्ये मित्रांसोबत खेळतांना मुलाच्या पायाला दुखापत झाली. त्याला 15 जूनला शाहपूर च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. तर डॉक्टरांनी त्याच्या पाय ऐवजी प्रायव्हेट पार्टची सर्जरी केली. व नंतर परत पायाची सर्जरी केली.
 
मुलाच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलीस अधिकारींनी सांगितले की चौकशी सुरु आहे. तर आरोग्य अधिकारी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे असे सांगण्यात आले आहे.