1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (09:23 IST)

Bus Accident : मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण रस्ता अपघात,बस पुलावरून खाली कोसळली, 2 ठार 52 प्रवासी जखमी

road accident in Rajgad Madhya Pradesh
इंदूरहून अशोकनगरकडे जाणारी प्रवासी बस राजगड जिल्ह्यातील पाचोर शहराजवळ ओव्हर ब्रिजच्या भिंतीला धडकून खाली पडली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 52 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. तेव्हा बालाजी ट्रॅव्हल्सची बस इंदूरहून अशोकनगरच्या दिशेने जात होती . सध्या बसमधील प्रवासी काहीसे झोपेत असून चालकासह इतर लोक गंभीर जखमी झाल्याने हा अपघात का व कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. 
काही लोकांचे म्हणणे आहे की चालकाला डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या खाली कोसळली. पाचोरापासून जवळच सारंगपूर मार्गावर सतगुरू हॉटेल जवळ हा अपघात घडला. 
 
बसमधील बहुतांश प्रवासी गुना आणि अशोकनगर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 41 जण रुग्णालयात दाखल आहेत. तर सर्व जखमींना तातडीने दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
MP Rajgarh Bus Accident ,