1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (17:01 IST)

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

छत्तीसगडमधील कबीरधाम (कवर्धा) जिल्ह्यातील कुकडूर पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी पिकअप दरीत कोसळून 18 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, उपमुख्यमंत्री आणि कवर्धाचे आमदार विजय शर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 
 
या पिकअप मध्ये एकूण 25 जण प्रवास करत होते. ही पिकअप मजुरांना घेऊन तेंदूपत्ता उपटून परत येत असता कवर्धाच्या बहपनी जवळ हा अपघात झाला. वाहन अनियंत्रित होऊन हा अपघात झाला.या अपघातात 17 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले आहे. 

या घटनेवर मुख्यमंत्री विष्णू साई यांनी शोक व्यक्त केला असून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.मी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
 
उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला विजय शर्मा यांनी लिहिले की, या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यात गुंतले आहे.

Edited by - Priya Dixit