गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (09:10 IST)

मध्य प्रदेशात चालत्या रेल्वेला लागली आग

मध्य प्रदेशात चालत्या रेल्वेला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. ज्यामुळे प्रवाशांना रेल्वेतून उडी मारून जीव वाचवावा लागला. ही रेल्वे इंदूरहून रतलामकडे जात होती. डेमू ट्रेनच्या इंजिनला आग लागल्याची घटना रुनिजा ते प्रीतम नगर दरम्यान घडली.
 
अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता.त्यामुळे  घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यात स्थानिक नागरिकांनी आणि रेल्वे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. स्थानिक शेतकऱ्यांनी मोटारपंप व पाईपच्या साहाय्याने आग विझविण्यात मदत केली व त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली.
 
या घटनेनंतर रेल्वेला रतलामला आणण्यासाठी पर्यायी इंजिनाचा वापर करण्यात आला. तसेच रेल्वे प्रशासनाने या लागलेल्या आगी बाबद चौकशीचे आदेश दिले आहे.

Edited By- Dhanashri Naik